टाकवे बुद्रुक: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या टाकवे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ, शितळादेवी, मरीमाता मंदिरामध्ये आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवास,घटस्थापना करून सुरवात करण्या आली. कोरोना महामारी आटोक्यात येत असताना, शासनाने दिलेल्या आदेशानुसार मंदिरे पुर्णवेळ उघडल्यामुळे भाविकांना जवळून दर्शन घेण्याचा लाभ मिळाला ,राज्य सरकार व पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेले आदेश व सूचनांचे पालन करत असताना मंदिर प्रवेश द्वाराजवळ सॅनिटाईझर स्टँडची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मंदिरामधील पुर्व परंपरा जपत असताना आंदर मावळ पंचकृषितील (आजूबाजूच्या)गावांमधील, फळने येथील भैरवनाथ मंदिर शितळा माता देवी मंदिर, डोंगरवाडी येथील सटवाई माता, वाहनगाव येथील अंजनी माता मंदिर अशा आंदर मावळ मधील अनेक ठिकाणी भाविक,भक्तगण मंदिर मध्ये धान्य घेण्यासाठी गर्दी करत असतात, व ते धान्य घेऊनच आपापल्या गावात व घरातील घटस्थापना विधी करत असतात. यावेळी देवस्थानचे पुजारी रामभाऊ गुनाट,ह.भ.प.सोपान गुनाट, मदन पिंगळे, शांताराम असवले, प्रकाश कोंडे, पोलीस पाटील अतुल असवले,रामनाथ असवले, बाळू घोजगे,ह.भ.प.देवराम असवले, राजू असवले, अर्जुन गुनाट
व आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!