मावळमित्र न्यूज विशेष:
बोरवली कांब्रे गावचे ग्रामदैवत किंबहुना
शेलार आणि आलम-देशमुख या दोन्हीं परिवारांची कुलस्वामिनी मळूबाई माता.जिच्या प्रति अपार निष्ठा आणि श्रद्धा गावकऱ्यांना आहे.नवरात्रोत्सवात घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते. यंदा कोरीनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा होत आहे.
निसर्गाच्या सानिध्यात व सहयाद्री पर्वत रांगेमध्ये वसलेल्या बोरवली गावातील मळूबाई मातेचं मंदिर प्रथमदर्शनी कौलारु मंदिर आहे.
मंदिराच्या भोवताली पाहता या ठिकाणी जून घडीव तोडीत बांधकाम केलेलं मंदिर असावं असे तिथे असलेले दगडांचे अवशेष पाहता अवगत होते,तसे लक्षात येते.
शेलार आणि शेलार यांचीच कुळी असलेल्या आलम-देशमुख परिवाराची ही कुलस्वामिनी आहे.
मुलांच्या मुंजी, लग्न समारंभापूर्वी होणारे जावळ याच मंदिरात गोड नैवेद्य व या मातेच्या मंदिरासमोर असलेल्या रखवालदारांना तिखटाचे नैवेद्य दाखवून केले जातात.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावापासून ५ मैल दूर असणाऱ्या खांडी येथील वनदेवाच्या भेटीसाठी या देवीची काठी पालखी नेऊन भाऊ-बहीण भेट घडवून आणली जाते.
तदनंतर देवीच्या काठी पालखीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढून गावातील अबाल-वृद्ध, माता-भगिनी,पंचक्रोशीतील भक्त मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात देवीची यात्रा साजरी होते. वाड्या-वस्त्या, डोंगर दऱ्या मधून मोठया भक्ती भावाने देवीच्या दर्शनाला अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात.
मार्च महिन्यामध्ये देवीच्या मंदिरात सप्ताह आयोजित केला जातो. या वेळी साथ ही दिवस नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांची सेवा आयोजित केली जाते.
संपूर्ण सप्ताह व काल्याच्या दिवशी स्नेहभोजन गावकरी व दानशूर मंडळी यांचे कडून जेवणावळी घालत्या जातात.
पंचक्रोशीत हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी ही मळूबाई माता अनेक लेकी-बाळींच्या संसारात सुख-शांती,ऐश्वर्य तर देते त्याबरोबर संतती प्राप्ती सुद्धा होते अशी श्रद्धा येथील माता-भगिनींची आहे.श्रद्धाळू आणि कष्ठाळू स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या भक्ती भावाने या देवीचा घट बसवून याथोसंग पूजा मांडली आहे.
हे जगतजननी,वरदायिनी माते तुझ्या रुपांचा महिमा आगाद आहे. हे माते तुझ्या कृपा छायेने या जगावर आलेलं हे कोरोना महामारीचं संकट दूर कर.
आणि सर्व लहान-थोर मंडळी गुण्या गोविंदाने एकत्र नांदू दे…अशी प्रार्थना भाविक मातेच्या चरणी करीत आहेत.
(शब्दांकन- सुभाष आलम अध्यक्ष गडकल्याण संवर्धन प्रतिष्ठान)

error: Content is protected !!