वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज,जोगेश्वरी मंदिरा मध्ये आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवास घटस्थापनेने सुरू झाला. शासनाने दिलेल्या आदेशानुसार भाविकांना दर्शन घेता येणार आहे प्रशासनाच्या आदेश व सूचनांचे पालन करत असताना मंदिर प्रवेश द्वाराजवळ सॅनिटाईझरची सोय करण्यात आली आहे. श्री पोटोबा महाराज मंदिर मधील पुर्व परंपरा जपत असताना वडगांव व पंचकृषितील (आजूबाजूच्या)गावांमधील भाविक,भक्तगण मंदिर मध्ये धान्य घेण्यासाठी गर्दी करत असतात, व ते धान्य घेऊनच आपापल्या गावात व घरातील घटस्थापना विधी करत असतात देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे व पुजारी सुरेश गुरव यांचे शुभहस्ते घटस्थापना करण्यात आली .यावेळी देवस्थान चे प्रमुख विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश ढोरे, अनंता कुडे किरण भिलारे,चंद्रकांत ढोरे,अँड.अशोक ढमाले,अँड.तुकाराम काटे,अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे,सुभाषराव जाधव, पुजारी मधुकर गुरव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!