वडगाव मावळ:
आज पासून धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी खुली झाली आहेत. या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.या सूचनांचे पालन करून धार्मिक स्थळांवर दर्शन घेता येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना असलेले प्रसिद्धपत्रक जाहीर केले आहे.
या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की,”६५ वर्षावरील नागरिक, गर्भवती महिला, दहा वर्षाखालील मुले यांनी घरी थांबावे. धार्मिक स्थळे यांचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती संघटना संस्था काम करणारे कामगार यांना कोणाची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे .धार्मिक स्थळे येथे गर्दी करू नये. दोन व्यक्ती मधील अंतर कमीत कमी सहा फूट असावे.
दर्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क असावा. साबणाने वारंवार हात धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. खोकताना शिंकताना रुमालाचा वापर करावा. भाविकांच्या आरोग्य बाबत पाहणी करून आजार काही लक्षणे आढळल्यास जिल्हा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा .धार्मिक स्थळावर थूंकण्यास बंदी आहे. येथे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल. धार्मिक स्थळांच्या प्रवेशद्वारावर हात देण्याची व्यवस्था करावी .
थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे .लक्षणे नसलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. कोरोना प्रतिबंधक उपाय योजना दर्शवणारे फलक लावावेत. भाविकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत धार्मिक स्थळावर वेळोवेळी कोणाला थांबता येईल यासाठी टाइम्स स्लोट करून देण्यात यावा. आवश्यक ठिकाणी वाहने पार्किंग करावी .पादत्राणे वाहनात ठेवावी. धार्मिक स्थळाच्या आवारात दुकाने स्टॉल्स येथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी .दर्शन घेण्याकरता सोशल डिस्टन्स पालन करावे. रांगेत उभे राहण्यासाठी मार्किंग करून सहा फुटाचा अंतर ठेवावे.
धार्मिक स्थळ परिसरातील मूर्ती पुतळा पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध असेल .मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे मेळाव्येस प्रतिबंध असेल .रेकॉर्डिंग केलेली भक्ती पर गीत गाणे लावता येतील परंतु संगीत वाद्य गायन गटास प्रतिबंध राहील .अभिवादन करताना,शुभेच्छा देताना हाताला स्पर्श टाळावेत .धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्रसाद वाटप प्रतिबिंबित राहतील .धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रभावीपणे निर्जंतुक करण करावे .शौचालय परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा.परिसरातील फ्लोर एरिया वारंवार स्वच्छ करण्यात यावा. फेस कवर, मास ,हॅण्ड ग्लोज यांची योग्यरीत्या विल्हेवाट करण्यात यावी. येथे काम करणारे कामगार यांचा कोरोना पासून बचाव यासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. धार्मिक स्थळांच्या परिसरात covid-19 चे संशयित रुग्ण अथवा बाधित रुग्ण आढळून आल्यास अशा व्यक्तीस एका खोलीत स्वतंत्रपणे इतरांपासून विलंब करण्यात यावे. याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावी.

error: Content is protected !!