वडगाव मावळ:
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर यांनी या वर्षीचा बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा केला.बैलपोळ्याच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत सभापती वायकर यांनी मावळ तालुक्यातील लसीकरणासाठी उपयोगी येणाऱ्या परंतु सध्या तुटवडा येणाऱ्या दहा हजार सिरीन आरोग्य विभागाकडे सुपूर्त केल्या.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत .लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अनिल गिरी,डॉ.रणदिवे,डॉ.पोळ,डॉ.महालिंगे, यांच्या कडे सुपूर्द केल्या.
दरवर्षी मोठ्या थाटामाटाने बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. या वर्षी साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा होत आहे सभापती वायकर यांनी घरगुती पद्धतीने गोठ्यातच बैलांची पूजा अर्चा करून नैवेद्य देऊन सण साजरा केला.
तसेच पुणे जिल्ह्यात जनावरांना संसर्गजन्य आजाराने देखील ग्रासलेले आहेत.त्यातच बऱ्याच शेतकऱ्यांच्या पशुधनाचा मृत्यू झाला आहे सभापती बाबूराव वायकर यांनी आवाहन केले आहे की ,” कुठल्याही प्रकारची, ढोल ताशा डीजेची मिरवणूक न काढता आपल्या घरातच बैलांची साध्या पद्धतीने पूजा करून बैलपोळा सण साजरा करा .तसेच आपली व आपल्या कुटुंबियांची तसेच जनावरांची काळजी घ्या.

error: Content is protected !!