वडगाव मावळ:
अवकाळी पावसात अंगावर वीज पडून त्यात या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. राज भरत देशमुख (वय १४)रा.खांडी असे त्याचे नाव आहे. रानात चरायला गेलेली बैल आणायला तो रानात गेला होता. अवकाळी पाऊस आल्याने रस्त्यालगत झाडाच्या आडोशाला थांबला,दुर्देवाने त्याच्यावर वीज पडली त्यात त्यांचा अंत झाला त्याच्या मागे आई,वडील,भाऊ असा परिवार आहे. कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.राज च्या जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!