पवनानगर:
कोरोनामुळे तब्बल गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा पासून सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. शाळेच्या पहिला दिवशी पवना विद्या मंदिर पवनानगर या शाळेत विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊ स्वागत करण्यात आले.
ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक भागांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत, तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल देखील नाहीत. अशा विद्यार्थी आणि पालकांतर्फे ऑफलाइन शाळा सुरु करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर करोनामुक्त गावांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.आज पहिल्याच दिवशी शाळेत ६२५ विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले,माजी उपसभापती जिजाबाई फोटफोडे, भरत ठाकर प्रतिष्ठाण संस्थापक ज्ञानेश्वर ठाकर, लोहगड सोसायटीचे चेअरमन गणेश धानिवले, मुंबईच्या उद्योजिका कल्पना बन्साली,केंद्र प्रमुख पांडुरंग डेंगळे,पंचायत समिती विषयतज्ञ सुचिता भोई , आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र मोहिते,मुख्याध्यापिका अंजली दौंडे, पर्यवेक्षिका निला केसकर , शालेय समिती सदस्य नारायण कालेकर, सरपंच खंडु कालेकर, उपसरपंच अमित कुंभार, नामदेव फोटफोडे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण, तसेच शाळेचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
विविध मान्यवरांनकडुन शाळेला सॅनिटायझर व खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले,मुंबई येथील उद्योजिका कल्पना बन्साली , काले ग्रामपंचायत सरपंच खंडुशेठ कालेकर,शालेय समिती सदस्य नारायण कालेकर आदी उपस्थित होते
दिलीप राक्षे युवा मंच , जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले व काले पवनानगर यांच्या वतिने शाळेत सॅनिटायझर,मास्क, थर्मल मशीन व खाऊ वाटप करण्यात आला.
विद्यार्थ्यानो काळजी घ्या, कोरोना आजुन संपलेला नाही असेआवाहन डाॅ.राजेंद्र मोहिते यांनी केले. मोहिते म्हणाले,” कोरोना आजुन संपलेला नाही. सगळ्यांनींच काळजी घ्यायला हवी शासनाने आज पासुन ग्रामीण भागात ५ वी ते १२ पर्यंतचे वर्ग तर शहरी भागात ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग आज पासुन सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे शासाने जे नियम घालुन दिले आहे त्याचे काटरकोर पणे पालन करा मास्क लावा सॅनिटाझरचा वेळोवेळी वापर करा.योग्य ती काळजी घ्या.
कल्पना बन्साली म्हणाल्या की,कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या , शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. आज आम्हाला आमचे शाळेचे दिवस आठवले .यापुढील काळात शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बस उपलब्ध करून देण्यात येईल.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे व संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे सचिव संतोषजी खांडगे साहेब यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे नियोजन माध्यमिक विभागाचे शिक्षक, प्राथमिक विभाग व ज्युनिअर कॉलेज प्राध्यापक यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे यांनी केले सुत्रसंचलन भारत काळे तर आभार शाळेचे जेष्ठ अध्यापक सुनील बोरूडे यांनी मानले.

error: Content is protected !!