आंदर मावळ : बेलज येथील बौद्धविहाराच्या सभामंडपाच्या कामाचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार सुनिल शेकळे यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्यासह माजी. नगरसेवक संदीप शेळके,सरपंच भुषण असवले, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, एस.आर.पी केंद्रीय सदस्य व संत तुकाराम साकर कारखाण्याचे संचालक बाळासाहेब गायकवाड, एस.आर.पी चे तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हळ, पुणे जिल्हा प्रवक्ते कोंडीबा रोकडे, राष्ट्रवादी युवकचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले मा,सरपंच दत्तात्रय पडवळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर,एस.आर.पी उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, नाणे मावळ अध्यक्ष संदीप ओव्हाळ, कार्यध्यक्ष बाळासाहेब कदम, अनिल मालपोटे, नारायण मालपोटे, अतुल कोकाटे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.यावेळी सिद्धीर्थ तरूण मंडळांकडून उपस्थित सर्वांचे सन्मान व आभार प्रदर्शन करण्यात आले.

error: Content is protected !!