वडगांव मावळ:
ढोल ताशांचा दणदणाट..चहूबाजूने ओसांडून वाहत येणारा कार्यकर्त्यांचा जथा… लोकनेते शरदचंद्र पवार साहेब….अजितदादा पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…सुनिल अण्णा शेळके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!या आणि अशा अनेक घोषणांनी वडगाव मावळ दुमदुमून गेले.
लाखो कार्यकर्त्याचा ओसांडून वाहणारा उत्साह क्षणा क्षणाला द्विगुणित होत होता. गळ्यात राष्ट्रवादीची शाल,डोक्यावर घडयाळाची टोपी,आणि अंतःकरणात नेतृत्वावरील दृढ विश्वासाने बेंबीच्या देठापासून यशाला साद घालणारा कार्यकर्त्यांची आरोळी,मावळच्या कणाकणात पोहचली होती.
समाज कार्यांसाठी त्याने कसली कंबर..सुनिल अण्णा शेळके दादा एक नंबर…या गाण्याने सा-या मावळला याड लावलं..तो उत्साह…ती शक्ती..निष्ठा आणि लढण्याची जिद्द त्यातच दिवशी एकवटली होती. तो दिवस होता ४ ऑक्टोबर २०१९.याच दिवशी मावळचे आमदार सुनिल शंकरराव शेळके यांनी लाखो समर्थकांच्या साक्षीने वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयात विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
भाजपचे नगरसेवक,उपनगराध्यक्ष पदावर काम करीत असलेले सुनिल शेळके यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुकाभर सामाजिक उपक्रमाची राळ उडून दिली होती. कार्यकर्त्याच्या वाढदिवसापासून ते सुख दु:खाच्या अनेक प्रसंगी खंबीर पणे उभे राहून सुनिल अण्णांनी जनमताचा कौल जाणून घेतला होता. आरोग्य,शैक्षणिक,स्वयंरोजगारावर भर देत त्यांनी अनेकांना आधार दिला होता. कित्येकांचे अश्रू पुसले होते. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर मोफत जाण्यायेण्याची सोय करून त्यांनी कित्येक पालकांची जबाबदारी स्वीकारली. हजारो रूग्णांची सेवा केली. महिला बटत गटाचे जाळे तालुकाभर विणले,विठ्ठल परिवाराच्या पुढाकाराने विठ्ठल नामाचा जप केला. प्रत्येक घटकाला न्याय देता येईल साठी रात्रीचा दिवस करून राबलेल्या अण्णांच्या हाताला अनेकांनी साथ दिली. काल पर्यत भाजप मध्ये असलेले सुनिल शेळके यांनी महाराष्ट्राचे नेते भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घडयाळ हातात बांधले तो दिवस होता,३ ऑक्टोबर २०१९.
आणि दुसऱ्याच दिवशी ४ ऑक्टोबरला लाखो समर्थकांसह त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन वर्षापूर्वीची ही सगळी छायाचित्रांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. शेळके यांचे समर्थक या घटनेला उजाळा देत आहेत. यासाठी त्यांनी केलेले स्पेशल व्हिडिओ,बॅनर्सला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शेळके यांच्या कामाची स्वतंत्र यंत्रणा सक्षमपणे उभी आहे.
दोन वर्षापूर्वीच्या घटनेचे साक्षीदार असलेले मावळातील महिला आणि पुरूष कार्यकर्ते या छायाचित्रांचे मोठे समर्थन करीत आहेत.वडगाव मावळ या शहराने राजकारणातील अनेक मिरवणुका,सभा पाहिल्या आहेत.
निवडणूक ग्रामपंचायतीची असो की,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची. निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची असो की विधानसभेची. वडगाव शहरातून शक्तिप्रदर्शन करीत ग्रामदैवत पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन पुढे तहसीलदार कार्यालयाकडे जाते ही परंपरा आहे. हीच परंपरा जपत दोन वर्षांपूर्वी विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्या शक्तिप्रदर्शनाने आता पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

error: Content is protected !!