टाकवे बुद्रुक:
सेवाधाम ट्रस्ट संचालित माळेगाव खुर्द येथील विनाअनुदानित शासकीय आश्रम शाळेत उद्योजक मनिष रघुनाथ झेंडे यांच्या तर्फे धान्य व किराणा वाटप करण्यात आला.
यावेळी आंदर मावळ कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष शेखर मालपोटे, आंदर मावळ राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गोरख मालपोटे, माजी सरपंच बाळासाहेब
खंडागळे, उपसरपंच शंकर बो-हाडे,.मुख्याध्यापिका प्रमिला भालके,मनोहर भालके, .दशरथ वडेकर, सुषमा काठे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सद्या पितृपक्ष सुरू आहे, या काळातील अन्नदानाचे वेगळे महत्व आहे. उद्या पासुन शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू होते,या पूर्वेला उद्योजक मनिष झेंडे यांच्या कडून विद्यार्थ्यांना शिधावाटप व खाऊ वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!