मुंबई:
शिवसेना डबेवाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचा दावा मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केला आहे.
डबेवाल्यांना लोकल रेल्वे स्टेशन बाहेर मोफत सायकल स्टॅन्ड उपलब्द करून दिले आहेत. चर्नीरोड,ग्रॅटरोड,अंधेरी येथील सायकल स्टॅन्ड पुर्ण होऊन डबेवाले ते स्टॅन्ड वापरत आहेत. अनेक रेल्वे स्टेशन बाहेर सायकल स्टॅन्डचे काम प्रगती प्रथावर असल्याचे सांगून तळेकर म्हणाले,”
जसं जशी जागा उपलब्द होईल त्यांवर ते अवलंबून आहे. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने डबेवाल्यांना मोफत सायकली वाटण्यात आल्या होत्या त्या मुळे डबेवाल्यांना काम करण्यासाठी सायकल मोफत उपलब्द झाल्या.
डबेवाल्यांच्या घराचा प्रश्ना बाबत आघाडी सरकारच्या वतीने महत्वाच्या बैठका मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व तात्कालीन कामगारमंत्री व विद्यमान गृहमंत्र्यांनी दिलीप वळसे-पाटील यांचे नेतृत्वाखाली पार पडल्या जवळ जवळ डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न हा अंतिम टप्या पर्यंत पेहचला आहे. लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल.
तसेच डबेवाला भवनचा प्रस्ताव मुंबईची महानगरपालिका सभगृहाने पारीत केला आहे. डबेवाला भवनाचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनं अर्थसंकल्पात एक कोटी रूपयांची तरतुद केली आहे. डबेवाला भवन हे दक्षिण मुंबईत असावे या बाबतचा डबेवाल्यांचा आग्रह आहे. दक्षिण मुंबईत जागा उपलब्द झाली की डबेवाला भवनचा प्रश्न मार्गी लागेल.
डबेवाल्यांच्या आरोग्य बाबत मुंबई महानगरपालिका सभागृहांने ठराव पारीत केला आहे. की डबेवाल्यांच्या उपचारासाठी मुंबई महानगर पालिका रूग्णालयात विषेश कक्ष असावा लकरच या ठरावाची अंमल बजावणी होईल अशी आम्हाला अशा आहे.
गेल्या पाच वर्षात आश्वासनांची पुर्तता करण्याचा प्रामणीक प्रयत्न शिवसेने कडून झाला आहे ही बाब सत्य आहे. डबेवाल्यांचे प्रलंबित प्रश्न व आश्वासन लवकर लवकर मार्गी लावण्यासाठी
“ मुंबई डबेवाला असोशिएशन” चे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन त्यांना आश्वसने पुर्ण करण्या बाबत निवेदन देणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले. “मुंबई डबेवाला असोशिएशन” ला दृढविश्वास आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतीलं. आणि डबेवाल्यांचे प्रश्न सोडवतील.
मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेची नाळ जोडली गेली आहे. त्या मुळे शिवसेनेची मराठी अस्मिता कधी खोटी असू शकत नाही असेही तळेकर म्हणाले.

error: Content is protected !!