मावळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व लोणावळ्याचा बुलंद आवाज कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा
लोणावळा : मावळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व लोणावळा शहराचा बुलंद आवाज, कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य, विरशैव लिंगायत गवळी समाजाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व साप्ताहिक बुलंद मावळ संस्थापक संपादक कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांचे गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारी मुळे दुःखद निधन झाले. त्यांस तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त हॅटेल चंद्रलोक येथे प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला.
प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधत आळंदीचे ह भ प विष्णु महाराज खांडेभरड यांचा सुश्राव्य प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रथमतः श्री. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलित करण्यात आले.
त्यानंतर ह भ प श्री विष्णु महाराज खांडेभरड आळंदीकर यांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री नारायण आंबेकर यांच्या हस्ते पुष्पमाला देऊन सत्कार करण्यात आला. व ज्ञानेश्वरी पूजन करण्यात आले. ह भ प विष्णु महाराज खांडेभरड यांनी कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांची महती सांगताना म्हणाले. भाऊंनी आपल्या जीवनात मी पणा,माझे, मला व अहंकार सोडून दिला होता त्यांनी दया, करुणा, निष्ठता, पारदर्शकता आणली होती .
वैभव सोडून परमार्थिक, सामाजिक वृत्ती मानणारे असे दत्ताभाऊ होते. अशाप्रकारे व अनेक उदाहरणाचे दाखले त्यांनी आपल्या प्रवचनातून कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांची महती सांगताना सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका आरोही तळेगावकर, काँग्रेस अल्पसंख्याकांचे बाबूभाई शेख, काँग्रेस मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख, भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव भांगरेपाटील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, अरण्येश्वर मित्र मंडळ, पुणे. अध्यक्ष श्री अर्जुनराव जानगवळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व भाऊंचे सहकारी बाबूलाल नालबंद, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव, ज्येष्ठ नगरसेवक धीरूभाई कल्याणजी पुणे जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष मच्छिंद्र खराडे, सहकार महर्षी माऊली दाभाडे, माजी राज्यमंत्री मदनशेठ बाफना यांनी कै. दत्तात्रय गवळी यांच्या बद्दलच्या कामाची पद्धत, अनुभव, प्रामाणिकता, स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी कायम धावपळ करणारे व्यक्तिमत्व, कोणताही प्रकारचा भेदभाव करत नसे, प्रत्येक काम तळमळीने करणारे, प्रामाणिक असणारे, मतभेद असले तरी मनभेद नसणारे, एखाद्या गोष्टीवर अवलंबून न राहता ती बाजूला सारून पुढील कर्तव्य करणारे. अशा या अनेक आठवणीना सर्वांनी उजाळा दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. उपनगराध्यक्ष श्री विलास बडेकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास माजी राज्यमंत्री मदन बाफना, सहकारमंत्री माऊली दाभाडे, तालुक्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, यशवंत पायगुडे, राजू बोराडे, मच्छिंद्र खराडे, ह भ प श्रीमंत रमेशसिंह व्यास, नगरसेविका आरोही तळेगावकर, उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी मा. उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, पिंपरी-चिंचवडचे मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, अरणेश्वर मित्र मंडळ पुणे अध्यक्ष श्री. अर्जुन जानगवळी, ज्येष्ठ समाजसेवक धीरूभाई कल्याणजी मा. नगरसेवक बाळासाहेब जाधव, मा. सभापती जितेंद्र कल्याणजी, भाजपाचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, काँग्रेस महिला अध्यक्षा पुष्पाताई भोकसे ज्येष्ठ नेते वसंतराव भांगरे पाटील, हारपुडे पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. विलास विकारी, मा नगराध्यक्ष राजू गवळी, नगरसेवक सुधीर शिर्के, श्रीराम मारुती ट्रस्टचे अध्यक्ष नगरसेवक दिलीप लोंढे, अनिल गवळी, मोहन औरंगे, प्रकाश रगडे, मनोज मोगरे, यतिन अकोलकर, नितीन अगरवाल, अतुल जोशी, तसेच नगरसेविका बिंद्रा गणात्रा, अनिस गणात्रा, आणि ज्येष्ठ वकील सुहास नागेश साहेब, श्रीराम नवमी भजन मंडळ अध्यक्ष ह भ प काळूराम महाराज देशमुख, ह भ प धोंडीबा महाराज सुतार, ह भ प विष्णुबुवा काळे, ह भ प खंडू कंधारे, ह भ प एकनाथ दळवी, ह भ प महादेव तिकांडे, ह भ प दिलीप महाराज खेंगरे, ह भ प भाऊ मापारी, ह भ प मुकंद मोरे, महादेव गवळी, पोपटराव भानुसघरे, वसंतराव भानुसघरे, मा. नगरसेवक अशोक मावकर, ह भ प भरतशेठ येवले, अनिल तोडकर, सुधिर साळुंखे, आनंद शेट्टी, नितीन वाडेकर, नंदू हुलावळे, संजय देवकर, अतुल जोशी तसेच गवळीवाडा ग्रामस्थ, व्यापारी वर्ग, किडा वर्ग, पत्रकार वर्ग, वकील वर्ग, सांप्रदायिक संस्था यातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. वीरशैव लिंगायत गवळी समाज महाराष्ट्रातील प्रतिनिधी व नातेवाईक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम पार पडण्यास लंगोटे परिवारासह समस्त गवळीवाडा ग्रामस्थ व संलग्न संस्था यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमा अंतर्गत कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी प्रतिष्ठान ची घोषणा व नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

error: Content is protected !!