वडगाव मावळ :
लोकसेवेचा वसा घेतलेले वडगाव मावळ युवा उद्योजक
हॉटेल शिवराज चे मालक अतुल खंडू वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आंदर मावळ मावळातील कुसवली गावातील आदिवासी कुटुंबियांना ब्लॅंकेट तर लहान मुलांना ड्रेस व खाऊ वाटप करून त्यांनी वाढदिवस साजरा केला.
तसेच येथील सहारा वृद्धाश्रमातील व्यक्तींना ब्लॅंकेट व अकरा हजार रुपयांची देणगी देण्यात आली. आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.ऐन हिवाळ्याच्या पूर्वेला मिळालेल्या या ऊबदार मायेच्या पांघरूणाने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
यावेळी अतूल वायकर, सरपंच चंद्रभागा दाते, प्रा. महादेव वाघमारे, कैलास खांडभोर, सागर आगळमे, रमेश भुरुक, विकास सातकर, निलेश शिंदे, वैभव नवघणे, अमित नवघणे, विजय जगताप, शिवराज ग्रुपचे सदस्य व आदिवासी बांधव उपस्थित होते.
अतुल वायकर म्हणाले,” सामाजिक बांधिलकीतुन समाजातील गरीब व गरजूंना मदतीचा हात देणे हे कर्तव्य आहे. मावळात पावसानंतर कडाक्याची थंडी पडते यावेळी आदिवासी बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी ब्लॅंकेट वाटप केले. माहेरची साडी वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रमाने साजरा केल्याचे समाधान वाटते.
दरम्यान,
“आदिवासी बांधवांची थंडीची चिंता मिटल्याने त्यांनी अतुल वायकर यांचे आभार मानले.
प्प्रा. महादेव वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. रमेश भुरुक यांनी सुत्रसंचालन केले. सागर आगळमे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!