टाकवे बुद्रुक:
येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक, ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक , न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाकवे बुद्रुक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवून आणि शाळा पूर्वतयारी निमित्त सर्व शालेय वर्गखोल्या व परिसर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले. व स्वच्छतेचे संदेश देऊन व स्वच्छतेचे महत्त्व सांगून कोरोना काळात स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि दैनंदिन कामकाज सुरू ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले अशाप्रकारे नवनवीन उपक्रम राबवून नेत्यांची जयंती साजरी करण्यात आली.
सरपंच भूषण असवले, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, माजी उपसरपंच सत्तू दगडे, सोमनाथ असवले, अविनाश असवले, परशुराम मालपोटे, सुवर्णा असवले,ज्योती आंबेकर, प्रतिक्षा जाधव, ग्रामसेवक एस.बी. बांगर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषा मोढवे, उपाध्यक्ष, सुमित्रा काकरे, मुख्याध्यापक शिवाजी जरग, उद्योजक दत्तात्रय असवले, लेखनिक सुशील वाडेकर व उपस्थित होते.

.

error: Content is protected !!