देहूरोड:
शेलारवाडी गाव हे देहूरोड कँन्टोंमेंट बोर्डाच्या हद्दीत असल्याने येथे विकासकामे करताना संरक्षण विभागाची सातत्याने अडचण येते.तरीही याबाबत पाठपुरावा करुन अधिकाधिक निधी या गावाला देण्याचा माझा मानस आहे.येथील दोन अंतर्गत रस्ते मंजूर केले असून भूमिगत वीज,नवीन शाळा,रस्तेविकास यांबाबत निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिले.
शेलारवाडी येथे लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शेळके बोलत होते. मावळ विधानसभा मतदारसंघातील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील सातही वॉर्डात भव्य महालसीकरण अभियान राबवण्यात आले.त्याअंतर्गत शेलारवाडी ता.मावळ या गावातील नागरिकांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून कोव्हिशिल्ड लस उपलब्ध होत मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले.
सातत्याने राबवत असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत समाधानकारक यश प्राप्त होत आहे.या लसीकरण मोहिमेसाठी महाविकास आघाडी आणि आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लसीकरण उदघाटनप्रसंगी आमदार सुनिल शेळके, देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष कृष्णा दाभोळे,देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माछी उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, नामदेवराव भेगडे,
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मा. उपाध्यक्ष प्रविणशेठ झेंडे, सुदाम भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सतिश भेगडे, युवा नेते योगेश माळी, सामाजिक कार्यकर्ते किशोर माळी, संजय माळी,बजरंग दल जिल्हा मंञी संदेश भेगडे, माऊली भेगडे, स्वप्निल माळी, श्याम मोहिते, अंकुश माळी, तुषार माळी, संतोष माळी आणि ग्रामस्थ मंडळी आदी उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,”
सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असून पुन्हा अशा प्रकारचे अभियान राबवण्यात येईल.”शेलारवाडी गावात लसीकरण झाल्याने जेष्ठ नागरिकांची जाण्या-येण्याची अडचण दूर झाली.त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला.लसीकरणासाठी वैद्यकीय मदत केलेल्या सर्व वैद्यकीय स्टाफचा यावेळी सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!