पवनानगर :
गोवा येथे २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२१ रोजी थायबॉक्सिगं या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये देशातील २७ राज्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये चुरशीच्या लढतींनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.या मध्ये पिंपरी चिंचवड खेळाडुंन चागंली कामगिरी केली. महिला ५० किलो वजन गटामध्ये मावळ तालुक्यातील वारु येथील तृप्ती निंबळे हिने गोल्ड मेडल पटकावले.तर ३० किलो वजनी गटात स्नेहा सपकाळ गोल्ड मेडल, पुरुष ५० किलो वजनी गटात अथर्व बुडके याने सिल्व्हर मेडल तर कृष्णा दिवाकर याने ही सिल्व्हर मेडल पटकावले.
यामध्ये प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे थायबाँक्सिंग चे अध्यक्ष पाशा अत्तार व तृप्ती निंबळे,यांचे या खेळाडुंना मार्गदर्शन लाभले. त्यांनी मेडल मिळवल्या मुळे त्यांच्यावर राज्यभरातुन कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
●तृप्ती निंबळेची गगनभरारी सुरुच….
गोल्ड मेडल मिळवले वर्ष
भुतान येथे २०१६ साली
आगत येथे २०१७ साली
नॅशनल स्कुल गेम २०१७ साली
मध्यप्रदेश २०१८ साली
पंजाब येथे २०१९ साली
गोवा येथे २०२० साली
गोवा येथे २०२० साली
सिल्व्हर मेडल मिळवलेले वर्ष
आसाम २०१३ साली
आशा अनेक ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व सिल्व्हर मेडल ची कमाई तृप्ती निंबळे हिने केली आहे. व आताही तिने गोल्ड मिळवले आहे त्यामुळे तिचे सर्वचं स्थारातुन कौतुक होतं आहे.

error: Content is protected !!