पुणे:
लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर जीवापाड प्रेम करणा-या कार्यकर्त्यांचा वणवा नाही. त्यांच्या प्रेमापोटी अनेक तरुण कार्यकर्ते पवारांच्या छबी टिपून संग्रही ठेवीत आहे. अनेकांनी त्यांची तैलचित्र रेखाटली.अनेक जाहीर कार्यक्रमात पवारांची हुबेहूब रांगोळी कित्येक कलाकारांनी रेखाटली. एका शेतकरी बांधवाने पवारांना झाडे लावून मानवंदना दिली.
त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर लेखन झाले.पवार साहेबांचे एखादे वाक्य प्रसार माध्यमात ब्रेकींग न्यूज ठरत आहेत. वर्तमानपत्रात मथळे होत आहे. पवारांची लोकसंग्रहता सर्वश्रुत आहे.राजकारणातील अनेक वादळांना सामोरे जाताना हा सह्याद्री कधीच डगमगला नाही. अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पाल्यापाचोळया सारख्या त्यांनी उडवून लावल्या. राजकारणातील पितामह भीष्म, पवार इज पाॅवर, सतरंज के सबसे बडे खिलाडी या आणि अशा अनेक उपाधी गौरविलेल्या साहेबांवर अनेक आरोपांच्या फैरी डगाल्या गेल्या.
ईडीच्या चौकशीला मीच ईडीच्या कार्यालयात येतो असे दंड पवारांनी थोपटून आवाहन दिल्यावर देशभर या घटनेने वादळ उठले होते. सातारा जिल्ह्य़ातील भर पावसातील सभेने राजकारणाची दिशा बदली.पवार यांच्या चाहत्यांत आंबेगाव, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या नावाची भर पडली आहे.शिंदे यांनी लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांचे चित्तवेधक शिल्प साकारले आहे.
शिंदे यांच्या या वर्कशॉपला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली,आणि शिंदे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!