मुंबई:
कोरोना महामारीमुळे थांबलेली मुंबई पुन्हा केंव्हा सुरू होणार आणि कोरोनावर मात करणारी रामबाण लस कधी सापडणार ? हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न?
कोरोना या जैविक संकटामुळे बहुतेकांचे रोजगार बंद पडून उपासमारीची वेळ आहे. त्याला डबेवाला ही अपवाद ठरला नाही.
सरकार आपल्या परीने लोकांना वाचवण्याचा आणि प्राथमिक गरजा पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतंय. काही सामाजिक संस्था देखील लोकांना या मानसिक दडपणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सर्व धकाधकी मध्ये एक व्यक्तीने आपल्या डबेवाले बांधवांना साधने-सुविधा उपलब्ध करून दिली आणि आपल्या डबेवाले बांधवाना सर्वोतोपरी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न अद्यापही करते आहे , ती व्यक्ती म्हणजे मुंबई डबेवाला असोशिएशन” चे विद्यमान अध्यक्ष “श्री सुभाष गंगाराम तळेकर”
तसं मुंबईच्या लाईफलाईन मध्ये “डबेवाले” हे नाव सर्वपरिचित झालंय, ते त्यांच्या कामांमुळे आणि काम करण्याच्या पद्धतीची माहिती लोकांसमोर समर्पक स्वरुपात मांडून दाखवल्यामुळे…. शेवटी “दिखत है तो बिकत है”. तर मार्च महिन्यात मुंबई थांबली तशी ‘मुंबईच्या डबेवाल्यांनी ही आपली सेवा तात्पुरती बंद केली. हातावर पोट असणा-यांसाठी हा काळ अतिशय कठीण आणि जीवघेणा होता. प्रत्येक जीव स्वत:च्याच जगण्यासाठी धडपडत असताना, सुभाष तळेकर ही व्यक्ती आपल्या डबेवाले बांधवांनसाठी मदत गोळा करण्यासाठी प्रयत्नशील होते. गेले दिड वर्ष त्यांनी विविध “ मुंबई डबेवाला असोशिएशन” च्या माध्यमातून डबेवाल्यांना मोफत रेशनिंग’ उपलब्ध करून दिलं. तसेच डबेवाल्यांना थेट
धनादेशाचे माध्यमातुन आर्थिक मदत केली.
लोकं कोरोनाचा सामना करण्यास उभी टाकणारच तर महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळलं आणि पठारी भाग चक्रीवादळात सापडला. अनेकांची घरे उडून गेली, प्रपंचाची लक्तरे रस्त्यावर उघडी पडली आणि तात्पुरत्या जगण्याची आस देखील मावळली. अशा वेळी देखील हा माणूस आपल्या लोकांच्या मागे गंभीरपणे उभा राहिला. कधी सरकारकडून तर कधी सामाजिक संस्थांकडून निधी मिळवून, वादळात ज्यांची घरे उद्वस्थ झाली त्यांना आर्थिक मदत केली.
लोकांच्या प्रपंच्याला आणि मनाच्या उभारणीला कर्तव्य तत्परता दाखवली. आता शाळा चालू होतील? अशी नुसती आस लागली तरी त्यांनी याच डब्बेवाल्यांच्या मुलांसाठी शाळेला लागणा-या वस्तू, ‘वह्या-पुस्तके-पाटीपेन्सिल-दप्तरे’ यांची उपलब्धता करून दिली. करोना किंवा अपघाता मुळे काही डबेवाले मृत पावले अशा डबेवाल्यांच्या कुंटूबाला यथा शक्ती आर्थीक मदत “ मुंबई डबेवाला असोशिएशन” च्या माध्यमातुन सुभाष तळेकर यांनी केली.
आमदार निलेश लंके यांनी पारनेर मध्ये अकराशे खाटांचे कोव्हिड सेन्टर उभारले होते त्या कोव्हिड सेन्टरला रूपये एक लाख मदत केली.मुंबईतील फुटपाथ वरील उपाशी पोटी झोपणार्यांच्या पोटाला ही अन्न भेटले पाहीजे म्हणुन आपण मुंबईत “रोटीबॅन्क” चालू केली रोटीबॅन्केच्या माध्यमातून तुम्ही कित्येक कोटी रूपयांचे वाया जाणारे अन्न वाचवून ते भुकेल्या लोकांना वाटले व त्यांची भूक भागवली.
तसेच “कपडा बॅन्केच्या” माध्यमातून आदिवासी भागांत तुम्ही कपडे वाटत आहात. संकट काळात पुरग्रस्त भागात कोल्हापुर, महाड या ठिकाणी तुम्ही मदत पोहचवली.समाज सेवा हीच ईश्वर सेवा, हे फक्त बोलायला बरं वाटतं. परंतु त्यासाठी कष्ट घेताना आपल्या कुटुंबांचा वेळ दुस-यांसाठी देऊन देखील अनेकांचे टचके-टोमणे सोसावे लागतात. येव्हढे दिव्यसायास करून ही सामाजिक बांधिलकी जपणारी ही माणसं सतत प्रयत्नशील राहतात म्हणूनच त्यांची “प्रयत्नांती परमेश्वर” इतरांना मिळतो.
काहींना वारसा हक्काने धन-दौलत मिळते, तर काहींना सामाजिक रुतबा, तर श्री सुभाष गंगाराम तळेकर यांना वडील कै.गंगाराम तळेकर (मॅनेजमेंट गुरु- डबेवाले कामगाराचे नेते ) यांच्याकडून लोकांच्या समस्यांचं समाधान करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कष्ट सोसण्याची उपजत देणगीच मिळाली आहे.
“कुणी वंदा अथवा निंदा, आपल्या सेवेशी तत्पर हाच आमचा धंदा”- कै. गंगाराम लक्ष्मण तळेकर यांनी दिलेल्या या मंत्रावर सुभाष तळेकर वाटचाल करत आहे. सुभाष सर खरंच तुमचं कार्य वंदनीय आहे. तुमच्या कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा.
(शब्दांकन :भानुदास तानाजी पानमंद)

error: Content is protected !!