मावळमित्र विशेष:
आंदर मावळच्या पश्चिम भागातील बोरवली एक खेडं. शेतीशी नाळ जोडलेले प्रगतशील शेती.किंबहुना शेतीवर ज्यांचे प्रेम होते असं हाडे शेतकरी अन गावचे कारभारही. जोडीला आळंदी पंढरीचे वारकरीही. वै.ह.भ.प.श्री.नानाभाऊ धोंडिबा शेलार.त्यांच्या पत्नी श्रीमती सखुबाई नानाभाऊ शेलार.कुटुंबासाठी राबणारे हे दोन्ही हात अनंतात विलीन झाले. त्यांच्या कष्टाला,संस्काराला,मायेला,त्याच्या शिकवणीला उजाळा देण्याचा आजचा दिवस. आज या दांपत्याचा पुण्यस्मरण सोहळा.
मोठ्या आपुलकीने आणि प्रेमाने,आस्थेने चौकशी करणारे नानाभाऊ शेलार पंचक्रोशीत’ मामा’ नावाने तर गावात ‘नानाबाबा’या बिरुदावलीने लोकप्रिय. आपल्या भावाला पोलीस पाटीलकीचा मान देणा-या नानाबाबाने इतरांचे मोठे पण जपले. आणि त्याच पुण्याई वर त्याचा लेक,नातही सरपंच पदा सारख्या मानाच्या पदावर आली. येथे येऊन त्यांनाही त्या पदाची उंची वाढवली. की दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात त्यांची नात प्रतिमा हिचे कौतुक केले.
बोरवलीत शेतीला दुग्धव्यवसाय, पीठ गिरणी व किराणा मालाच्या दुकानाची जोड देऊन नानाबाबांनी आपल्या संसाराचा बारदाणा जोपासला. त्याला सखूबाई आत्यांनी आयुष्यभर साथ दिली.
पतीच्या शब्दाचा आदर करीत तीही तितक्याच आबदीने संसारात वागली. लेकी,सूना,मुलांना हिताच्या चार गोष्टीचे संस्कार दिले. तशी गावात अनेकांच्या अडीअडचणीला सुख दु:खाला धावून आले. मुलांना-मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन आपली मुले समाजात नावारूपाला यावी म्हणून अथक कष्ट केले.,त्याला संस्काराची जोड देऊन व्यवहारचातुर्य शिकवले.
कै.नानाभाऊंनी आपले बंधू श्री.दत्तातेय धोंडिबा शेलार यांना पोलीस पाटील केले.बंधूंच्या मार्गदर्शनाने दत्तात्रेय शेलार यांनी ४० वर्ष गावच्या पोलीस पाटील पद अगदी निष्ठने सांभाळले.
कै. नानाभाऊ शेलार यांचे जेष्ठ चिरंजीव कै. प्रभाकर शेलार यांनी ही शेती सोबत इतर उद्योग धंद्यांच्या माध्यमातून आपला प्रपंच सांभाळत असताना गावच्या पंचक्रोशीत एक महत्त्वपूर्ण वलय निर्माण करत जिवा-भावाचे सहकारी जमवले,त्यांच्याशी अगदी जवळीकता निर्माण केली आणि अखंड पणे सांभाळले,तेही डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्याचे मोठेपण नियतीला मान्य झाले नाही.
कौटुंबिक प्रगतीचा प्रवास जोरात असताना नियतीने त्यांचे चिरंजीव हिरावून घेतले.उमद्या पोराचं अचानक पणे निधन झाले,हा नानाबाबा आणि सखुआई यांच्या जीवनातील सर्वात मोठा दुय:खाचा आघात ठरला.
हा आघात पचवत असताना हार न मानता सर्व लक्ष धाकट्या चिरंजीवावर केंद्रीत केले.त्याही लेकाने कधी आईच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस येऊ दिला नाही.
त्यांचे धाकटे चिरंजीव नामदेवराव यांना चांगले शिक्षण देत असताना समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू आपसूक देत राहिले.जे आता डाहुली ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून काम करीत आहेत.
नामदेवराव शेलार यांनीही आपल्या बंधूंच्या पाऊलावर पाऊल ठेवून उत्तमरीत्या आपल्या उद्योग धंद्यात कार्यरत राहिले वडिलांचा आणि भावाचा गावाप्रति असणारा स्नेह त्यांना गावच्या राजकारणात आणि समाजात सेवा करीत राहिले. त्यांनी राजकारणाचा श्री गणेशा सहकारातील संस्थाच्या माध्यमातून केला. दोन्ही काँग्रेस एकत्रित असताना १९९९ पूर्वी ते आंदर युवकचे व त्यानंतर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष झाले. श्री. गणेश दूध सहकारी सोसायटीचे चेअरमन,खांड वि.सोसायटी चे संचालक, चेअरमन पद भूषवले. सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी २००५ साली ग्रामपंचायत ची निवडणूक लढवली व भरघोस मतांनी निवडून आले. पुन्हा मुलींच्या माध्यमातून २०१५ते २०२० या दोन्ही पंचवार्षिक निवडणूकीत निवडून येऊन आदर्शवत कार्य केली.त्याच बरोबर याही वर्षी हॅट्रिक मारून आपली विजयी पताका तालुका पातळीवर मोठया दौलने कायम ठेवली.
आजही तालुक्यातील तील महत्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत या सरपंचांचा मोलाचा वाटा असतो. कै.नानाभाऊंची तिसरी पिढी व नामदेवरावांची कन्या सौ. प्रतिमा शेलार-भेगडे यांनीही आपल्या आजोबांच्या संस्कारांचा वारसा जोपासत २०१५-२०२० या कालावधीत निवडणूक लढवली. सौ.प्रतिमा शेलार-भेगडे यांनीही आपल्या गतपंचवार्षिक काळात ३.५ कोटींची भरीव विकासकामे केलेली आहेत.
त्यांना महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने सन्मानित केलं आहे. सकाळ माध्यम समूहाने देखील त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गुणगौरव केला आहे या आदर्श उभयतांच्या संस्काराचा वारसा त्यांचे बंधू, मुले, पुतणे,नातू अतिशय उत्तमपणे सांभाळत आहेत.
संपूर्ण तालुक्यात सामाजिक आणि राजकीय अस्तित्व सांभाळणाऱ्या या कुटुंबाचा नेहमी आदर्श घेतला जातो.आपल्या पिढीने आई-वडिलांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून समाजाची सेवा करावी हे वृत्त हा परिवार सांभाळत आहे. खरंतर नामदेवरावांच्या माध्यमातून हे सेवाभावी कार्य अखंड चालू आहे या माता-पित्यांचे पुण्यस्मरणाला इतकेच म्हणावे वाटते,आपल्या कार्याचा वसा आणि वारसा अखंडित पणे असाच बहरत रहो,तूमच्या आशीर्वादाचे वलय आमच्या पाठीशी सदैव असावे शेताच्या बांधावर फिरताना आणि गावच्या वेशीत पाऊल टाकताना आपल्या आठवणीने स्फुरण आणि बळ मिळावे.
(शब्दांकन- सुभाष आलम,संस्थापक अध्यक्ष गडकल्याण संवर्धन प्रतिष्ठान)

error: Content is protected !!