मावळमित्र न्यूज विशेष:
नाव भिकाजी मुक्ताजी भागवत.शिक्षण बी.ए.जी.डी.सी. अँन्ड ए, एच.डी.सी.एम.पदवीधर असलेल्या या तरूण सहकारी मित्राला सामाजिक कार्याचं अंग आहे. समाजा प्रती असलेला कनवळा या तरूणाला स्वस्थ बसू देत नाही. आख्या गावाचं भल व्हावं ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावी त्याची तळमळ आणि धावपळ सा-या पंचक्रोशीनं पाहिली.
तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ घेऊन कसं काम करता याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काॅलैजचा मित्र भिकाजी भागवत. या तरूण मित्रा बद्दल काय सांगावं आणि काही नाही हेच सुचेना. माझा मित्र माजी उपसरपंच, निगडे,अध्यक्ष, टाकवे गण राष्ट्रवादी काँग्रेस
सचिव, निगडे एम.आय.डी.सी. टप्पा क्र. ४ अशा बिरुदावली त्याच्या नावापुढे लावतो. तेव्हा हा मित्र असल्याचे वेगळ समाधान मनाला मिळतं.
या मित्राने दु:खाची दरी अनुभवली. दु:खाच्या खोलीत डुंबून हुंदके दिलेत. आज सुख पायाशी लोळण घेत असल्याने आम्हा मित्राना मोठे समाधान आहे.
भिकाजी भागवत निगडेच्या शेतकरी कुटूंबात जन्मलेले अभ्यासू, संयमी, व्यक्तीमत्व.
प्राथमिक शिक्षण निगडे तील जिल्हा परिषेदेच्या शाळेत.येथेच चार भिंतीच्या आत माणसं जोडण्याची गोळा बेरीज केली. याच मैदानावर नेतृत्व गुण विकसित झाले.याच शाळेच्या प्रांगणात सामाजिक संस्काराची शिदोरी मिळाली. पुढे माध्यमिक शिक्षण कामशेतच्या पंडीत नेहरु विद्यालयात.महाविद्यालयीन शिक्षण तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालये व पुण्यात झाले. सहकार खात्यातील एल.डी.सी.एम, जी.डी.सी.अँन्ड ए.,एच.डी.सी.एम.या पदवी घेऊन बँकत मोठ्या पदावर अधिकारी होण्याचे स्वप्न.
पण समाजकार्याची आवड यामुळे ते सामाजिक कार्याकडे आपसूक ओढले गेल,. समाजकार्य व विकासाभिमुख कामात हा पठ्ठ्या कायमच अग्रभागी असतोच.वडीलांचे छञ सन २००२ साली हरपले.हा मोठी दु:खाचा बाका प्रसंग. त्यावरही आईने फुंकर मारून शिक्षण आणि संस्कार दिले. घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही वडीलांनी जोपासून ठेवलेली जमीन भिकाजी आणि भावंडांच्या साठी वरदान ठरली. वडीलांच्या मृत्यूनंतर आईने दिलेले संस्कार. व त्यातुन दिलेले शिक्षण यामुळे हे कुटूंब सर्वच क्षेञात अग्रेसर आहे. भाऊ, बहिणी नातेवाईक, मिञपरिवार कायमच त्यांच्या पाठीशी उभा राहिला. निगडे गांवची धुरा सांभाळत असताना ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास यामुळे त्यांना गावाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलता आला. ग्रामस्थ कायमच त्यांच्या पाठीशी राहिले. गोविञी गांव हे भागवत यांचे आजोळ. श्री. गणपतराव शेडगे हे त्यांचे मामा. मावळ तालुका पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी सांभाळले. तसेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद त्यांनी सांभाळले.
त्यानी भागवत कुटूंबाला दिलेला शैक्षणिक व राजकीय वारसा. दिलेला आधार व संस्कार यातुन या कुटूंबाला मोठा हातभार लागला. आज विकासाची कास धरलेले निगडे गांव पूर्वी गवत पिकवून उदरनिर्वाह करणारे गांव म्हणून लौकिक आहे. आंद्रा धरण निगडे व परिसरासाठी वरदान ठरले. भागवत व त्यांच्या मिञपरिवार यांनी आदर्श शेतीचे स्वप्न पाहिले.
आंद्रा धरणातून सामुहिक पाणीपुरवठा योजना अनेक कायदेशीर अडथळे पूर्ण करत त्यांनी पूर्ण केली. एका चरामध्ये १० पाईपलाईन टाकून ३५ शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे व्यासपीठ तयार केले. त्यातुन अनेकांना रोजगार मिळाले. त्यानंतर निगडे व पंचक्रोशीमाध्ये शेतकऱ्यांनी अनेक योजना करुन गवत पिकविणा-या भागाची बागायती म्हणून ओळख निर्माण होऊ लागली.
तळेगांव एम.आय.डी.सी, (निगडे) टप्पा क्र. ४ निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी या गावांंमध्ये शासनाने एम.आय.डी.सी.चे शिक्के टाकले.
स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी एम.आय.डी.सी. तुन वगळण्याचा मुद्दा व इतर मागण्या शासनाकडून मान्य करुन घेण्याच्या मुद्यावर एम.आय.डी.सी. सहकार्य करण्याची भुमिका सहकार्यांनी व त्यांनी घेतली. सचिव म्हणून कामा करत असताना आपल्या अभ्यासपूर्ण कामाने त्यांनी ठसा उमटविला.
भविष्यात या भागातील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच तालुका पातळीवरील सहकारी संस्थांवर काम कर्याची क्षमता निश्चितच भागवत यांच्यामध्ये आहे ,या तरूण मित्राचा आज वाढदिवस आहे,गतकाळातील आठवणीना उजाळा देत जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा.
(शब्दांकन- मंगेश घारे,मोरवे)

error: Content is protected !!