टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ मंडळी, गावातील सर्व तरूण मंडळ, महिला बचत गट व शेतकरी बंधू व भगिनींनी मंगळवार दिनांक २८ला सकाळी ११:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच भूषण असवले यांनी केले.
मावळ तालुक्यातील ज्ञान सरस्वती कंपनी व एमसीएल लि.कंपनी अंतर्गत नैसर्गिक इंधन निर्मिती प्रकल्प चालू करीत आहे.हा प्रकल्प निसर्ग संरक्षण व देशास इंधनांस संपूर्ण बनविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे .तसेच सर्व सभासद शेतकरी वर्ग यांस आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण बनविण्यासाठी महत्वाचे आहे.
या बैठकीला कंपनीचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहे सर्व ग्रामस्थ शेतकरी बंधू भगिनींनी व महिला मंडळ महिला बचत गट पदाधिकारी व सर्व तरूण मंडळानानी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच असवले यांनी केले.

error: Content is protected !!