मुंबई :
डबेवाल्यांसाठी मुंबईत “डबेवाला भवन” उभारणार यासाठी मुंबई महानगर पालिकेची कुठे जागा उपलब्ध आहे हे पाहुन निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट आश्वासन तात्कालीन शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईच्या डबेवाल्यांना दिले होते.
तीन वर्षा पुर्वीच्या मुंबई महानगर पालिकेच्या अर्थ संकल्पात “डबेवाला भवन”साठी १ कोटी रूपयांची आर्थीक तरतुद केली होती. या बाबत मुबंई तात्त्कालीन शिवसेना नगरसेविका व विद्यमान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी डबेवाला भवनचा प्रस्ताव मुंबई महानगर पालिका सभागृहात मांडला .
सभागृहानेही त्याला एक मताने मंजुरी दिली आहे. पुढे हा प्रस्ताव मुंबई महानगर पालिका आयुक्त यांचे मंजुरीसाठी पाठवला गेला. “ डबेवाला भवन” साठी जागा उपलब्द न झाल्यामुळे “डबेवाला भवन” अद्याप पर्यंत प्रत्यक्षात साकारले गेले नाही.
परंतु आमचा दृढविश्वास मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचेवर आहे. त्यांचे संयुक्त प्रयत्नाने लवकरच “ डबेवाला भवन” साठी जागा उपलब्द होईल व भव्य दिव्य असे “ डबेवाला भवन” लवकर साकारले जाईल असा विश्वास सुभाष तळेकर
अध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!