वडगाव मावळ:
जांबवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या लसीकरणाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला .यामध्ये एकूण २७० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले.
यासाठी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक ,प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी ,संगणक ऑपरेटर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, डॉक्टर व अधिकारी वर्ग व युवकांनी चांगले सहकार्य केले.

error: Content is protected !!