टाकवे बुद्रुक:
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोठी गर्दी उसळल्याने सोशल डिस्कशन फज्जा उडाला आहे. सकाळी लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्याची लुडबुड सुरू असून मर्जीतील व्यक्तींना लसीकरणाचा वशिला लावण्यासाठी काहींची धडपड सुरू होती. आरोग्य विभागांतील कर्मचारी आणि नागरिक यांच्यात काही सख्य जाणवले नाही. येथील सोशल डिस्कशनचा फज्जा आणि नागरिकाची गैरसोय या बाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!