पवनानगर:
तिकोना पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते व मावळ ॲग्रो टुरिझमचे माजी अध्यक्ष काशिनाथ शंकरराव मोहोळ (वय.५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून ते सुपरिचित होते.
पवना कृषी विकास संस्थेचे जेष्ठ संचालक म्हणून काशिनाथ मोहोळ यांनी काम पहिले. तिकोना पेठ येथे गेले १२ वर्षांपासून पर्यटन व्यवसायात त्यांनी मोठं योगदान दिले आहे.
किल्ले तिकोनाच्या पायथ्याला त्याचे पर्यटन केंद्रच्या माध्यमातून त्यांनी पवन मावळात पर्यटकांना राहायची सोय करून या भागात सर्वात आधी पर्यटन व्यवसाय सुरु केला. या भागातील तरुणांना पर्यटन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता .तसेच गावातील सामाजिक व राजकीय कार्यक्रमात प्रत्येकाच्या सुखात व दुःखात ते नेहमी सक्रिय राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे सबधं होते.
त्यांच्या अचानक जाण्याने पवन मावळ हळहळ व्यक्त होत आहे.रस्टिक व्हिला हॉटेल त्यांनी सुरू केले. माजी सरपंच सहादु मोहोळ यांचे ते भाऊ होते. तिकोणापेठचे युवा उद्योजक मोहन मोहोळ यांचे ते वडिल. आणि रोट्रॅक्ट क्लब तळेगाव दाभाडे चे माजी अध्यक्ष केशव मोहोळ व उद्योजक शंकर मोहोळ यांचे ते चुलते होत.

error: Content is protected !!