वडगाव मावळ:
कृषि व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर यांच्या पुढाकारातून साई ,नाणोली ,पारवडी या गावांमध्ये सुमारे ९१ लाख रुपयांची विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला.
या निधीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ वायकर यांच्या हस्ते करण्यात आला.
साई,नाणोली,पारवडी या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी वायकर यांचीढोल ताश्याच्या गजरात बैलगाडी मध्ये मिरवणूक काढली,व स्वागत केले.
आमच्या साई,नाणोली,पारवडी गावांमध्ये इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून काही कामे पूर्णही झाली आणि उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे,अश्या भावना उपस्थित महिला भगिनी व ग्रामस्थांनी केली.
सरपंच पल्लवी वाघुले,माजी सरपंच बाळासाहेब म्हाळसकर,माजी उपसरपंच विशाल वहिले,उपसरपंच ऋषीनाथ शिंदे उपसरपंच,सोपान काटकर,माजी सरपंच विठ्ठल मोहिते,अनिल मोहिते,सुनील दंडेल,सुनील चव्हाण,भाऊ ढोरे,अक्षय रौधळ,माजी सरपंच मारुती काटकर,पोलीस पाटील हणमंत वाडेकर,ग्रामपंचायत सदस्य जयश्री वाडेकर,मंदा गाडे,अर्चना पिंगळे,अश्विनी काटकर,माजी सरपंच सुवर्णा काटकर,नवनाथ काटकर,नितीन पिंगळे,रमेश पिंगळे,गोविंद पिंगळे,भाऊ जाधव,दत्ता पिंगळे,सुदाम जाधव, सुरेश गरुड,धोंडिबा पिंगळे,बबन वाडेकर,गजानन वाघुले,सोपान पिंगळे,शंकर पिंगळे,गणेश ना पिंगळे,संतोष पिंगळे,अंकुश पिंगळे,राम पिंगळे,राम धुमाळ,राम वाघुले,दशरथ पिंगळे,गौतम वाडेकर, गोविंद वाघुले,एकनाथ वाडेकर,सोमनाथ वाडेकर,दक्ष काटकर,भोळा काटकर,अतुल काटकर,अंकुश काटकर इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थिती होते. ग्रुप ग्रामपंचायत साई,नाणोली,पारवडी ग्रामस्थांच्या वतीन वायकर यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!