वडगाव मावळ:
उरण – भीमाशंकर राज्य मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गमध्ये करून त्यास राष्ट्रीय
महामार्गाचा क्रमांक व त्या मार्गास निधी मिळवा अशी मागणी खेड तालुका भाजपाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,दिलीप मेदगे यांनी केली आहे.
रस्ते,जहाज व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देशमुख यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे. उरण – भीमाशंकर राज्य मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गमध्ये करून त्यास राष्ट्रीय
महामार्गाचा क्रमांक व त्या मार्गास निधीसाठी त्यांनी या मार्गाचे महत्व गडकरी यांना विशद केली.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात देशमुख, मेदगे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीष बापट यांच्याशी चर्चा करून ही मागणी केली.
उरण-भीमाशकर मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई-लोणावळा खंडाळा मार्गास नवीन पर्यायी मार्ग होईल. चाकण, रांजणगाव एम.आय.डी.सी.पिंपरी-चिंचवड,पुणे,शिरूर तसेच नगर जिल्ह्य़ाचे मुंबई व कोकणाचे १०० किलोमीटरने अंतर कमी होईल.
तीर्थक्षेत्र भीमाशंकरला येणाऱ्या भविकांना पर्यायी मार्ग
उपलब्ध होईल या आगातील पर्यटन वाढेल पर्यायाने रायगड जिल्यातील – पुणे खेड तालुक्यातील
आदिवासी भागातील नागरिकांचे आर्थिक जीवनमान सुधारेल ही बाब त्यानी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.

error: Content is protected !!