इंदापूर:
पुणे जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर यांनी इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या गोठ्याला भेट देऊन नुकसानीबद्दल शेतक-याचे सांत्वन केले.
इंदापूर तालुक्यातील डाळज नं.3 येथील पशुपालक शेतकरी गणेश जगताप,लालासाहेब रामदास गलांडे व हणमंत गलांडे यांच्या गोठ्यावर भेट देऊन, या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल सांत्वन केले,यावेळी जिल्हा परिषद सदस्य हणमंत बंडगर,गणेश कदम उपस्थित होते.
गणेश जगताप यांच्या गोठ्यातील १६ जर्शी गाई व लालासो रामदास गलांडे यांच्या ६ गाई आणि हनुमंत जगताप यांच्या ३ गाई,५ कालवड,लाळखुरकूत व घटसर्प आजाराने मृत्युमुखी पडले.
ही घटना अतीशय दुःखद आहे. पशुधनाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना व पशुपालकांना जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा आहे. परंतु जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आलेली आहे .त्या अंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जनावराला प्रत्येकी १५००० रुपये इतकी अनुदान पर रक्कम देण्यात येईल, इतर माध्यमातून जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन सभापती बाबूराव वायकर यांनी यावेळी पशुपालक यांना दिले.
संपूर्ण जिल्ह्यात लसींचा औषधांचा तुटवडा झाला होता. पण आता लस मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत,शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्याव्या असे आवाहन त्यांनी केले. तसेच अशा घटना घडण्याच्या आधी त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल याकडे जास्तीत जास्त जबाबदारीने लक्ष देऊन पशुपालकांना मदत करा अशा सूचनाही संबंधित विभागाच्या डॉक्टरांना दिल्या, यावेळी ,सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!