तळेगाव दाभाडे :
शहरातील १९ केंद्रांवर ‘महालसीकरण अभियान’ सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री संत कैकाडी महाराज समाज मंदिर, लायन्स क्लब, युनिक हॉस्पिटल, कन्याशाळा,अथर्व हॉस्पिटल, हरणेश्वर हॉस्पिटल, सेवाधाम हॉस्पिटल या केंद्रांवर जाऊन भेट दिली. लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स व नागरिकांशी आमदार सुनिल शेळके यांनी संवाद साधला.
संपूर्ण मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकास लस मिळावी या उद्देशाने महालसीकरण अभियानाचा चौथा टप्पा राबविण्यात येत आहे. प्रशासकीय यंत्रणेसह, खाजगी हॉस्पिटल, डॉक्टर्स, कर्मचारी, स्वंयसेवक,सामाजिक संस्था यांनी सामाजिक भावनेतून सहकार्य करीत या महालसीकरण अभियानास बळ दिले आहे. आपणही सर्वांनी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांचा आदर ठेवत सहकार्य करुन हे अभियान यशस्वी करायचे आहे. लसीकरणास व्यत्यय येऊ नये,नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सर्व केंद्रावर माझे सहकारी सुद्धा उपस्थित असून नागरिकांची काळजी घेत आहेत,असा विश्वास आमदार शेळके नागरिकांना देत आहेत.
आमदार सुनिल शेळके यांच्यासह तळेगावाचे मुख्याधिकारी सतीश दिघे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, नगरसेवक संतोष भेगडे, आनंद भेगडे, विशाल दाभाडे, नगरसेविका संगिता शेळके, मयुर टकले, संकेत खळदे, लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, दिपक शहा, दिपक बाळसराफ, राजश्री शहा, प्रमिला वाळुंज, मनोहर दाभाडे, सुनिल वाळुंज, राजेंद्र झोरे, गौरव शहा, सिद्धार्थ किल्लावाला, इतर मान्यवर व युवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!