पुणे:
जिल्हा दूध संघाच्या अक्रियाशील सभासदांना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा अधिकार देऊ नये. या सभासदांना मतदानाचा हक्क मिळू नये, यासाठी जिल्हा दूध संघाने न्यायालयात जावे, असा ठराव सर्व क्रियाशील दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडला. हा ठराव पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणा-या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली या सभेत काही ठरावांना मंजुरी देण्यात आली. तसेच दूध उत्पादक शेतक-यांना बोनस जाहीर करण्यात आला.
यंदाच्या वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला फार महत्व होते. ही सभा ऑनलाईन झाल्याने फारसी गाजली नसली,तरी अक्रियाशील सभासदांना मतदानाचा हक्क मिळू नये हा ठराव मंजूर करून प्रसंगी न्यायालयात जाण्याच्या ठरावाला सर्वानुमते मिळालेली मंजुरी यात निश्चित महत्व आहे.
काही दिवसापूर्वी आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन दूधसंघाच्या कारभारावर तोफ डागली होती. त्यात अक्रियाशील सभासदांना मतदानाचा हक्क मिळू नये हा ठराव संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर जिल्हा दूध संघाची निवडणूक चागली गाजणार असे चित्र दिसतेय.

error: Content is protected !!