जामखेड:
भाजपचे कर्जत येथील भाजप नेते आणि उपनगराध्यक्ष नामदेव देवा राऊत, नगरसेविका हर्षदा अमृत काळदाते, उषा अक्षय राऊत, किरण पाटील, सतीश समुद्र, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, किरण पाटील आणि रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यांच्या समवेत अमृत काळदाते, भाजपाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस इरफान सय्यद, भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामदास हजारे, बाजार समितीचे संचालक बजरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते इन्नूस पठाण, दीपक ननवरे, अरबाज पठाण, साहिल कुरेशी अलिम कुरेशी यांनी हातात घडयाळ बांधले.
कोणत्याही अपेक्षे शिवाय लोकहितासाठी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या या नेत्यांचं स्वागत करुन अजितदादांनी त्यांच्याशी संवादही साधला. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी दाखवलेला विश्वास पुढील काळात सार्थ ठरवला जाईल. त्यांच्या प्रवेशामुळं पक्षाची कर्जतमधील ताकद वाढण्यासही निश्चितच मदत होणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, सुभाष गुळवे, नितीन धांडे, प्रसाद ढोकरीकर, बापूसाहेब नेटके, भास्कर भैलुमे, अभय बोरा, रज्जाकभाई झारेकरी, दीपक शिंदे, लालासाहेब शेळके आणि नितिन तोरडमल आदी स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!