अखिल भारतीय युवक मराठा महासंघ मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर
वडगाव मावळ:
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ मावळ तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मावळ तालुका अध्यक्ष पदी चेतन वाघमारे यांची निवड करण्यात आली. सर्वांना निवडीचे पत्र अखिल भारतीय युवक मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणजित जगताप यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब पवार, प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ, तळेगाव दाभाडे मावळ चे माजी नगराध्यक्ष सत्यद्रराजे दाभाडे सरकार, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष अजय घुले, मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम पुणे येथील पत्रकार भवन येथे घेण्यात आला होता,कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्मधील अखिल भारतीय युवक मराठा महासंघाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्रमधील विविध जिल्हे व तालुक्यातील अनेक युवक उपस्थित होते.यावेळी सर्व युवकांना संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी युवकांना मराठा महासंघामध्ये काम करण्यासाठी मार्गदर्शन केले .जास्तीत जास्त युवकांचे संघटन होऊन मराठा समाजासासाठी व्यापक स्वरूपाचे काम होण्यासाठी एकजुटीने काम करण्यासाठी प्रेरित केले.
तसेच सत्यद्रराजे दाभाडे यांनी देखील मराठा महासंघाच्या कामाचे स्वरूप व माहिती विस्तुत पणे मांडली, अखिल भारतीय मराठा महासंघ प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
तसेच महाराष्ट्रमधून आलेल्या सर्व युवकांचे विशेष स्वागत व आभार अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष अजय घुले यांनी मानले.

error: Content is protected !!