टाकवे बुद्रुक:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी मनिषा प्रदीप मोढवे तर उपाध्यक्षपदी सुमित्रा गणेश काकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मुख्याधापक श्री. शिवाजी जरग ,मावळते अध्यक्ष चंद्रकांत असवले,कांता असवले, प्रदीप मोढवे,निगळे भाऊ,कांबळे मॅडम, असवले मॅडम,गायकवाड सर, काळे मॅडम, पाटील मॅडम उपस्थित होते.
चंद्रकांत असवले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली. अध्यक्षपदी मनिषा प्रदीप मोढवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
त्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त झालेल्या जागी सुमित्रा गणेश काकरे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
शालेय समिती पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी जरग यांनी केले. आभार प्रदीप मोढवे यांनी मानले.

error: Content is protected !!