टाकवे बुद्रुक:
जिद्द,चिकाटी आणि सातत्य ठेवले तर व्यवसायात यशस्वी होता येते, तरूणांनी संयम ठेवून व्यवसाय उभारा असे आवाहन टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले यांनी केले.
टाकवे बुद्रुक येथील पुर्वा एन्टरप्रायझेस च्या उद्घाटन प्रसंगी सरपंच भूषण असवले बोलत होते. बाजारात विकल्या जाणा-या प्रोडक्ट्सला असणारी मागणी पाहून या व्यवसायाची निवड करा असा सल्लाही त्यांनी तरूण पिढीला दिला.व्यवसायात संयम जितका महत्वाचा आहे तितकीच स्वच्छता,नीटनेटकेपणा देखील महत्वाचा आहे.
बळीराम पिंगळे,सागर पिंगळे यांनी सुरू केलेल्या दालनाचे उद्घाटन झाले.
यावेळी पोलीस पाटील अतुल असवले,उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,आंदर मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारूती असवले,बळीराम पिंगळे,सागर पिंगळे उपस्थित होते.

error: Content is protected !!