लोणावळा:
लोणावळ्यातील व्यवसाय करत असलेल्या टपरी पथारी हातगाडी गोरगरीब व्यवसायिकांवरती या कोरोना सारख्या महामारीत आधीच उपासमारीची वेळ आलेली असताना गोरगरीब कुटुंबीयांचं कंबरड मोडलेलं असताना लोणावळा नगर परिषद व MSRDC यांनी जी अन्याय कारक रित्या या टपरी धारकावरती कार्यवाही केली होती.
अशा अनेक गोर गरीब कुटुंबीयांचा हातावर सुरु असलेला रोजगार या नगरपरिषदेने मोडीत काढला आहे.अशा अन्याय ग्रस्त कुटुंबांना नुकसान भरपाई म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून मावळचे लोकप्रिय आमदार जमसेवक सुनिल आण्णा शेळके यांनी
मदत नव्हे तर कर्तव्य ही जाणीव समजून ज्या टपरीधारकांवरती कार्यवाही झाली होती आशा तेवीस कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत करण्यात आली.
यावेळी उपस्थित आमदार साहेबांचे धाकटे बंधू सुधाकर शेळके,वसंतराव काळोखे (ट स अध्यक्ष ),जीवनजी गायकवाड (रा कॉ शहर अध्यक्ष ),गणेश थिटे,विलास बडेकर (माजी काँग्रेस अध्यक्ष ), धनंजय काळोखे,अविनाश ढमढेरे, गणेश चव्हाण , लक्ष्मण दाभाडे , अमोलजी गायकवाड , फिरोजभाई शेख, निलेश लोखंडे,समीर खोले उपस्थित होते.

error: Content is protected !!