वडगाव मावळ :
आंदर मावळ राष्ट्रवादी काँगेसच्या
कार्याध्यक्ष पदी कल्हाटचे माजी सरपंच तानाजी करवंदे यांची व कल्हाट गावच्या राष्ट्रवादी काँगेसच्या अध्यक्ष पदी संतोष करवंदे यांची निवड करण्यात आली.
वडगाव मावळ येथे आमदार सुनिल शेळके यांच्या
हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मावळ तालुका सरपंच संघटनेचे
कार्याध्यक्ष सुनिल भोंगाडे, रोहिदास महाराज धनवे,
भिकाजी भागवत, दिगंबर आगीवले, रविंद्र पवार,
मनोज करवंदे,सुर्यकांत भांगरे, गोपाळ पवळे आदी
मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” गाव पातळीवर पक्ष संघटना बळकटी साठी कार्यकर्त्यानी सतत सतर्क रहावे. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन विकासाच्या कामासाठी सातत्याने आग्रह असायला हवे.

error: Content is protected !!