कामशेत:
राष्ट्रीय पोषण आहार अभियानांतर्गत कामशेत येथे पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महावीर हाॅस्पिटल च्या वतीने हिम्मोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.
एकात्मिक बालविकास प्रकल्प याच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा म्हणाले,” बालकांच्या योग्य वाढीसाठी सकस आणि पोषक आहाराची गरज आहे. मूलांना जंकफूड खाण्या पेक्षा प्रथिने व प्रोटीन युक्त आहार घ्यावा. पालकांनी रोजच्या आहारात मुलांना फळे,भाजीपाला आणि दुधाचा समावेश असलेला आहार द्यावा.
सकस आहारा सोबत मुलांनी व्यायाम करणे आवश्यक आहे. यावेळी एकात्मिक प्रकल्प विभागाच्या पर्यवेक्षिका सुनिता जोशी,डाॅ. देवीलाल भांबू उपस्थित होते. पस्तीस जणांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.

error: Content is protected !!