वडगाव मावळ :
कल्हाट गावच्या हद्दीतील डोंगराचे कडेला एका अर्धवट बांधकाम असलेल्या घरामधील खोलीत शनिवारी (दि.18) दुपारी छापा टाकुन कारवाई
बेकायदेशीररित्या तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर वडगाव मावळ पोलिसांनी करत तब्बल 7 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कल्हाट गावच्या हद्दीतील डोंगराच्या कडेला बेकायदेशीररित्या जमाव करून तीन पत्ती नावाचा जुगार खेळला जात असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. 18) दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी पैसे लाऊन तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना मनोज सयाजी करवंदे (वय 40), भाऊ दासु कल्हाटकर (वय 39), संतोश ज्ञानेष्वर देशमुख (वय 36 ), पप्पु लक्ष्मण नानेकर (वय 29), कैलास मारुती घोलप (वय 35), रघु कल्हाटकर (वय 29), भाऊ बाळु धनवे (वय 40), हरिभाऊ रघुनाथ खापे (वय 32), काषिनाथ भिमा कडु (वय 40), यांच्याकडे रोख रक्कम व इतर वाहने व वस्तू असा एकूण 7 लाख 73 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!