वडगाव मावळ:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीस मावळ तालुका पंचायत समितीच्या वतीने महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्कार सन-२०२०/२०२१ प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण तालुका स्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मावळ तालुक्यातील उद्योग नगरी म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत टाकवे बु” या ग्रामपंचायतील पुणे जिल्हा मध्ये व मावळ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकचा बहुमान मिळाला.
सभापती ज्योती शिंदे सभापती ,उपसभापती दत्तात्रय शेवाळे , माजी उपसभापती शांताराम कदम,गटविकास अधिकारी सुधीर भागवत गटविकास अधिकारी यांचे हस्ते टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले ,उपसरपंच ऋषीनाथ शिंदे ,ग्रामविकास अधिकारी श्री.एस.बी.बांगर ,माजी उपसरपंच व विध्यमान सदस्य अविनाश असवले, परशुराम मालपोटे सदस्य सुवर्णा असवले सदस्य, संध्या असवले सदस्या, ज्योती आंबेकर सदस्या प्रतीक्षा जाधव सदस्या प्रिया मालपोटे सदस्या यांनी हा सन्मान स्वीकारला.
सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्काराने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवदारे,कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या सह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शासकीय अधिकारी उपस्थितीत होते. त्या पाठोपाठ अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीस गौरविण्यात आले होते.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर काम करताना सर्व ग्रामपंचायत सदस्य,प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याने हा पुरस्काराने मिळाले. ही प्रेरणा घेऊन अधिक चांगले काम करू.

error: Content is protected !!