वडगाव मावळ:
कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुवर्णा राजेंद्र ढोरे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच राहुल वरसु येवले यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे ,रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.
उपसरपंच पदासाठी सुवर्णा राजेंद्र ढोरे. यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.सरपंच नवनाथ एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण सूर्यभान हुलगे(ग्रामविकास अधिकारी) यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. राहुल येवले, अनिल कडलक,स्वाती येवले, ओमेश्वरी ढोरे,आरती खैरे, यांसह ग्रामस्थांनी ढोरे यांचे अभिनंदन केले. भाग्यश्री येवले ,महादू येवले यांनी कार्यालयीन कामकाज पाहिले.

error: Content is protected !!