वडगाव मावळ:
गावकारभाराच्या अनेक पिढीचा राजकीय वारसा आणि एकोपा अबाधित ठेवणाऱ्या घराण्यातील शांत,स्मितभाषी आणि सुशिक्षित महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.वैजंती सुभाषराव आलम यांचं अभिष्टचिंतन मुळशी खोऱ्यातील नांदे गावच्या करंजावणे-देशमुख घराण्यात जन्मलेली ही एकुलती एक, अगदी लाडात आणि सुसंस्कृत परिवारात संगोपन झालेली ही कन्या.
परिवारात अतिशय हुशार, समंजस असं हे महिला नेतृत्व सर्व आप्तेष्टांमध्ये कायम आपल्या ओजस्वी स्वभाव शैलीने परिचित होतं.
आंदर मावळ मधील कांब्रे या गावातील पंचवीस वर्षे चारित्रसंपन्न पोलीस पाटील म्हणून नावलौकिक असणारे श्री.हाडकू रामभाऊ आलम यांचे चिरंजीव व गडकल्याण प्रतिष्ठान या गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक मा.सुभाषराव आलम-देशमुख यांच्या सोबत त्यांचा विवाह संपन्न झाला.
माहेरी असणारे संस्कार आणि सासरी असणारी लोकांप्रती सद्भावना या दोन्ही गोष्टींमुळे जनसामान्यांची सेवा करण्याची संधी नेहमी प्राप्त होत असे.
सासरे कै.नारायण नाना आलम(जेष्ठ गाव कारभारी), कै.यशवंत नाना आलम(प्रथम सरपंच),कै.वनगोजी आलम,कै.महादू आलम,कै.दत्तोबा आलम(मा.सरपंच) यांनी गावकारभारात अनेक गोष्टींमध्ये वेळोवेळी दिलेलं योगदान महत्वपूर्ण मानलं जातं. त्याचबरोबर दीर श्री.रामदास यशवंत आलम यांनी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाना मिळवून दिलेली शासकीय मदत,वयक्तिक लाभाच्या योजना.
त्याचबरोबर कुटुंबातील अहोरात्री सर्वांच्या मदतीला धावून येण्याची वृत्ती या सर्व गोष्टींच पाठबळ सोबत असताना.गावच्या सर्वांगीण विकासाचा हा लोकाभिमुख विचार सुरू असताना,अनुभवाचा-जनसेवेचा वारसा आणि सुख-दुःखांची जाणीव असताना,जनतेने सेवेची दिलेली संधी अशी,
नुकत्याच पार पडलेल्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये कांब्रे,बोरवली,कांब्रे-पठार या वार्डातील पॅनल प्रमुख,जेष्ठ नागरिक,महिला त्याचबरोबर ही निवडणूक प्रक्रिया स्वतःच्या खांद्यावर घेऊन तरुणांनी संपूर्ण मळूबाई ग्रामविकास पॅनल ला बहुमताने निवडून दिले.
दोन्ही गावांमध्ये असणारा सलोखा आणि जवळीकतेच्या माध्यमातून सर्वाधिक मताधिक्याने ग्रामपंचायत मध्ये निवडून येण्याचं भाग्य या महिला नेतृत्वाला लाभलं.
खरंतर या मध्ये डाहुली ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच नामदेवराव शेलार,तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष सुधीरशेठ आलम, ग्रामपंचायत सदस्य सुदामराव आलम,उद्योजक दशरथराव आलम, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब आलम,जेष्ठ कारभारी पांडुरंग(तात्या)आलम,उद्योजक राजेंद्र देशमुख,रामदास है. आलम,उद्योजक बाळू कदम या नेतृत्वाचा त्याचबरोबर कांब्रे,कांब्रे-पठार, बोरवली येथील आलम,शेलार,ठिकडे,जाधव,हिरवे,आंबेकर, कदम या सर्वच परिवारांचा सिंहाचा वाटा आहे अशी भावनात्मक,आदरात्मक आणि स्वाभिमानी बोली नेहमी त्यांच्या कडून बोलली जाते.
एक सुशिक्षित महिला सदस्या,अतिशय शांत आणि संयमी पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करत असून सर्वांशी त्यांचा सलोखा असल्याने, त्याच बरोबर जनसामान्यांत त्यांची जवळीकता पाहता पुढील काही दिवसांत ग्रामपंचायत च्या महत्वपूर्ण पदावर त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आदर्श सरपंच नामदेवराव शेलार यांनी दिली.
घरप्रपंच जेवढ्या काटकसरीने आणि चातुर्याने चालवतेस तशीच ग्रामपंचायत च्या कारभार देखील चाणाक्षपणे हाताळू शकतेस असा आत्मविश्वास पती श्री. सुभाषराव आलम यांच्या कडून त्यांना दिला जातो.
पुरुषप्रधान संस्कृती मध्ये माझ्या सारख्या महिलांना ही मोलाचं स्थान देऊन माझा योग्य तो सन्मान ठेवला जातो त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करताना दिलेल्या संधीला आणि विश्वासाला कायम जपण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्नशील राहील. कांब्रे,कांब्रेपठार, बोरवली व संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रातील जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्या नेहमी देत असतात.
शांत ,संयमी आणि सर्वांशी अगदी जिव्हाळ्याने,सलोखा राखणाऱ्या त्याच्या स्वाभिमानाचा अभिमान वाटतो. आणि भविष्यात अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना थोरामोठ्यांचा आदर्श हा कायम शिरसावंध्य ठेवून कार्य करत राहावं. आम्ही सर्व परिवार कायम पाठीशी राहू.अशा अभिष्टचिंतनाच्या सधीच्या आणि शुभेच्छा त्यांचे दीर श्री.संतोषराव आलम यांनी दिल्या.

error: Content is protected !!