कामशेत:
कामशेत येथील भोकरे परिवाराने घरगुती गणपतीची सजावटीत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरातील गाभा-याची सजावट केली आहे. शिवसेना शहरप्रमुख गणेश भोकरे व माजी उपसरपंच अश्विनी भोकरे यांच्या चिरंजीव साहिल भोकरेने ही प्रतिकृती साकारली आहे. टाकाऊ पासून टिकाऊ बनविण्याचा साहिलचा पहिल्या पासून कल आहे. ही कलाकृती बनविताना त्याने यापूर्वीच्या अनुभवातून ही कलाकृती साकरली आहे. साहिलच्या या कलेचे शहरात कौतुक होत आहे. साहिलचे आजोबा कै.रामदास भोकरे यांनीही कलेची मोठी आवड होती. या आवडीतून तेही नेहमीच उत्तम उत्तम देखावे सादर करीत असत. आजोबा आणि वडील यांच्या कलेचा वारसा लाभलेला उत्तम चित्रकार आहे. त्याने हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आमदार सुनिल शेळके यांच्या चित्रांचे रेखाटन केले आहे. साहिलच्या कलेचे नेहमीच कौतुक होते. यंदा त्याने महालक्ष्मी मातेच्या मंदिराचा गाभारा साकारून केलेली सजावट पाहण्या सारखी आहे.

error: Content is protected !!