वडगाव मावळ:
कल्हाट येथील कै.भिमाबाई बबन कल्हाटकर यांच्या पंचम पुण्यस्मरण दिनानिमित्त गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तु वाटप व वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना मसाज मशीन व ब्लँकेट वाटप करण्यात आले. पोलिस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळचे अध्यक्ष संदीप कल्हाटकर, सुभाष कल्हाटकर यांनी आईच्या स्मृतिदिनी हा विधायक उपक्रम घेण्यात आला. तसेच क्रिडा आघाडीचे अध्यक्ष विनायक कृष्णा कल्हाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक मदतीचा हात देऊन वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – कल्हाट, अंगणवाडी, वस्तीशाळा (गावठाण,पवळेवाडी, करवंदेवाडी,धनवेवाडी) येथील गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तु व दप्तर वाटप करण्याता आले,कल्हाट येथील वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांस मसाज मशीन व ब्लँकेट वाटप,कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांस मसाज मशीन व ब्लँकेट वाटप करण्यात आले.
यावेळी उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी उपसभापती शांताराम कदम, सरपंच सविता भांगरे,युवा नेते देवाभाऊ गायकवाड , रविंद्र शेटे, गणेश कल्हाटकर ,सोमनाथ शिंदे ,सुनिल चव्हाण,नामदेव वारींगे, जगनमोहन डिंग्रा,बबनराव आगिवले, रामदास चव्हाण, बाळासाहेब थरकुडे,संतोष जाचक,बबनराव ओव्हाळ, नारायण ठाकर, शरद मालपोटे, नवनाथ कल्हाटकर,अमोल आगिवले, शंकरशेठ आगिवले, संदेश शेलार, मंगेश शेलार, काळूराम थरकुडे, उमेश विश्वासराव, वैशाली विश्वासराव,गणेश भांगरे,रामदास यादव, दत्ता कल्हाटकर, भगवान पवार उपस्थित होते.
बाळासाहेब थरकुडे यांनी प्रास्ताविक केले. गणेश कल्हाटकर यांनी सुत्रसंचालन केले. संदीप कल्हाटकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!