कामशेत:
यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी राहते,त्याच्या यशात तिचा सिंहाचा वाटा असतो.मग ती आई,पत्नी,बहिण किंवा मुलगी असेल. पतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहून ती आपले कर्तव्य बजावत असते. त्यासाठी तिच्या त्यागाची इतिहासाने नोंद घेतली. पण पत्नीच्या मागे पती खंबीरपणे उभा राहून तिला यशाच्या शिखरावर पोहचवून तिचे मोठेपण वाढवू शकतो. हाही इतिहास आता घडविला जात आहे.
चूल आणि मूल या संकल्पनेच्या पलिकडे जाऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. असेच कर्तृत्व सिद्ध करणा-या कामशेत ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अँड.रोहिणी मुथा. वकिली पेक्षाची पदवी घेतलेल्या रोहिणी ताईनी राजकारण व व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अर्थात पती परेश मुथा यांच्या पाठिंब्यावर.
कामशेत शहरातील महावीर इलेक्ट्रॉनिक्स व महावीर हाॅस्पिटल मावळ तालुक्यात BRAND ठरतोय. मुथा परिवाराच्या या व्यवसायाचे वलय जिल्हाभर भर आहे. महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या दालनाला राज्यभरातील मोठे मोठे व्यापारी भेट देत आहे. येथील यूवियाचा BRAND देशभर पोहचवून त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नातील महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे स्वप्न येथे पूर्ण होत आहे. या महावीर दालनाचे सर्वेसर्वा परेश मुथा यांच्या पत्नी कामशेतच्या माजी सरपंच अँड रोहिणी मुथा.
आपल्या पतीच्या व्यवसायात महत्वाची भूमिका बजावत आहेत.
भगवान महावीरांप्रती प्रचंड आदर व श्रद्धा असलेले मुथा कुटुंबियांची स्वतंत्र ओळख आहे.ती त्याच्या सेवाभावी वृत्ती मुळे. जनसेवेचा वारसा आणि वसा या परिवाराने स्वीकारला तो सेवाधर्म मानून. मग ही रूग्णसेवा असो,संत सेवा असो,वारक-यांची सेवा की,पशू,पक्षी आणि प्राणीमात्रांची सेवा. या सेवे प्रति या कुटूंबाला मोठी आस्था आहे. या आस्थेने त्यानी किती सेवा केली असले त्याचा कधीही गवगवा नाही की,डामडौल नाही.
अशा परिवारातील कांतीलाल मुथा आणि कांचनबेन मुथा यांची स्नुषा असलेल्या रोहिणी ताई.
डाॅ. विकेश मुथा,परेश मुथा आणि निलेश मुथा या तिन्ही भावांने एकमेकाच्या साथीने व्यवसायात आपले बस्तान बसवले. व्यवसायात यश मिळालेच पाहिजे. हे आपले कर्म आहे. या कर्मावर कर्तव्यावर ठाम राहून सामाजिक जबाबदारीचे भान ही जपले आहे. त्यातून राजकारणातील यश मिळत गेले. अँड. रोहिणी परेश मुथा यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
पक्षाने आणि गावातील ज्येष्ठ मंडळीनी सरपंच पदावर संधी दिली. मिळालेले पद मिरवण्यासाठी नाही,ते सामाजिक दायीत्व निभावण्यासाठी आहे याची कल्पना असलेल्या रोहिणी ताईनी सरपंच पदावर आपले कर्तव्य पार पार केले. सध्या त्या व्यवसायात तळमळीने काम करीत आहे. व्यापारी कुटूंबातील रोहिणी मुथा यांचा प्रवास वकील,गावचे सरपंच,यशस्वी बिझनेस वुमन असा चढत्या आलेखात आहे. त्याच्या कार्याला आणि कर्तृत्वाला हार्दिक शुभेच्छा. हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा हेतू ऐवढाच आज रोहिणी ताई यांचा वाढदिवस. आजच्या वाढदिवशी आभाळभर शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या प्रति असलेल्या आदरातून चार ओळी लिहण्याचा प्रयत्न केला. ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

error: Content is protected !!