वडगाव मावळ:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मावळ तालुक्यात ४० ठिकाणी महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. मावळ तालुक्यासाठी १२ हजार लसीचे डोस उपलब्ध झाले असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे,भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी केले आहे.
हे महालसीकरण अभियान व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर भारतीय जनता पार्टी मावळच्या वतीने सहकार्य करण्यासाठी गावस्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. महालसीकरण अभियानात मोफत लस घेऊन कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी पुढे यावे, असे मावळवासीयांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
आम्ही लस घेतली आहे व आम्ही सुरक्षित आहोत.
तुम्ही पण लस, घ्या व तुम्ही सुरक्षित रहा, असेही
आवाहन तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, पंचायत
समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रय
शेवाळे यांनी केली आहे.

error: Content is protected !!