वडगाव मावळ :
मावळ तालुक्यात महाविकास आघाडी सरकार व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नांतून शुक्रवारी व शनिवारी महालसीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मावळातील लसीकरण केंद्रावर तब्बल १० हजार कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणार आहे.
नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र ,ग्रामीण रुग्णालय व इतर लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आमदार सुनिल शेळके यांनी मावळातील नागरिकांना आवाहन केले आहे.
मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी विशेष प्रयत्नातून मावळात महालसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.या पूर्वी देखील या लसीकरण अभियानाअंतर्गत मावळात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले असून शुक्रवारी(दि.१७) व शनिवारी (दि.१८) या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात मावळातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील लसीकरण करण्यात येणार आहे
यासाठी मावळातील २ ग्रामीण रुग्णालये , ६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३० उपरोग्य केंद्र आदी ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मावळात आत्तापर्यंत २ लाख ८० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या महालसीकरण अभियानामुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे.यामुळे शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला देखील सहज लस उपलब्ध होत आहे.

error: Content is protected !!