पवनानगर(नवनाथ आढाव) : पवन मावळ परिसरामध्ये गणरायाचे मोठ्या आनंदात भक्ती भावात व मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करुन मनोभावे बाप्पाची सेवा करण्यात आली.आज पाच दिवसाचे गौरी गणपती बप्पाना साध्या पद्धतीत व भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत.
कोरोना संक्रमणाचा विचार करता कोणीही गर्दी न करता आपल्या घरातील गौरी बाप्पाचे विसर्जन व्यवस्थेसाठी आपापल्या गावात गाडी फिरविण्यात आली त्या गाडी मध्ये गौरी व गणपती नेण्यात आले. व उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणावळा ग्रामीण चे पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश माने हे स्वतः नदीकाठी उभे राहून गर्दी न होऊन देता गोरी व गणरायाल निरोप दिला त्यांच्या मार्गर्शनाखाली त्यांच्या टीम ने काम केले.

error: Content is protected !!