पवनानगर: काले पवनानगर ग्रामपंचायतीच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवून श्रमदान करण्यात आले.जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती वडगाव मावळ यांच्या विद्यमाने काले ग्रामपंचावयतीच्या आज ग्रामपंचायत परिसरामध्ये महास्वच्छता राबवून श्रमदान करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक शाळा,पवना विद्या मंदिर व पवनानगर बाजारपेठ येथे श्रमदान करण्यात आले
गावामध्ये श्रमदान करणे ग्राम स्वच्छतेमध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेणे, गावातील कच-याचे वर्गीकरण करणे,प्लास्टीक बंदी विषयक जनजागृती
गावातीत सार्व गणेशमंडळांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे संदेश लिहण्यात आले
यावेळी सरपंच खंडूजी कालेकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश कालेकर, छायाताई कालेकर, फुलाबाई कालेकर, आशा कालेकर, ग्रामसेवक रविंद्र वाडेकर,पवना शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका निला केसकर, जेष्ठ अध्यापक महादेव ढाकणे, बापुसाहेब पवार, सुनिल बोरूडे,शिक्षक प्रतिनिधी राजकुमार वरघडे,वैशाली पाटील, सायन्स विभाग प्रमुख प्रतिभा ढमढेरे, प्राथमिक विभाग प्रमुख गणेश साठे,संजय हुलावळे,भारत काळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले होते
यावेळी बोलताना सरपंच खंडूजी कालेकर म्हणाले की, गावामध्ये दशलक्ष शोषखड्डे निर्मिती करण्यावर भर देणार असून शंभर टक्के हागणदारीमुक्त शाश्वतता टिकवण्यासाठी प्रयत्न करणार केले जातील त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करायचे आहे.

error: Content is protected !!