देहूरोड : शेलारवाडी ता.मावळ येथील श्री.संत सावता माळी मित्र मंडळाने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत असताना बालगोपाळांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी सामाजिक अंतर पाळत विविध स्पर्धांचे आयोजन केले..यावेळी झालेल्या फँन्सी ड्रेस स्पर्धेत अनेक बालचमुंनी सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर केले…अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने व आँनलाईन शिक्षणामुळे मुले कंटाळून गेलेली आहेत..मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धा कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत घेत लहानग्यांच्या कलेला प्रेरणा देताना आनंद वाटला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष चि.उत्कर्ष माळी व खजिनदार चि.अथर्व माळी यांनी सांगितले..सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्पर्धेतील मुलांचा अभिनय व सादरीकरण पाहिल्यानंतर मनानंद झाला असल्याची प्रतिक्रिया पालक प्रा.किरण माळी व उद्योजक श्री.मृणाल माळी यांनी दिली..
या स्पर्धेसाठी पंच म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.लक्ष्मण शेलार यांनी भूमिका बजावली..अशा स्पर्धांमुळे लहान मुलांचा सभाधीटपणा व आत्मविश्वास वाढीस लागतो अशा प्रतिक्रिया महिला पालकांनी दिल्या…स्पर्धेतील नातवंडांची कला पाहून अनेक आज्जीबाईही सुखावून गेल्या होत्या..लहान बालकांच्या कला-गुणांना वाव देणाऱ्या या मंडळाचे सर्वत्र कौतूक होत आहे…फँन्सी ड्रेस स्पर्धेचा निकाल…लहान गट..
प्रथम क्रमांक…चि.राजवीर अंकूश माळी
द्वितीय क्रमांक…चि.शिवांश वैभव माळी
तृतीय क्रमांक…कु.सृष्टी योगेश माळीमोठा गट…
प्रथम क्रमांक..चि.आर्यन दत्तात्रय माळी
द्वितीय क्रमांक..चि.श्रीरुप प्रशांत जगताप
तृतीय क्रमांक..चि.अदित्य नंदकुमार माळी
उत्तेजनार्थ…कु.हिंदवी संजय माळी

error: Content is protected !!