गणपतीदान व संकलन मोहिम
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करोनाचा प्रादुर्भाव असतानाही गणेशभक्तांच्या सोयीसाठी पाचव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाने केलेल्या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने ५ गाड्या गणपतीदान व संकलन करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.थेरगाव पुल घाट चिंंचवडगाव येथे घाटावर ३ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती संस्कार प्रतिष्ठानच्या २ गाड्या फिरत्या ठेवल्या होत्या.पाचव्या दिवशी पिंपरी येथील डॉ डि वाय पाटील फार्मसी महाविद्यालय सहभागी झाले होते.थेरगाव पुल घाटावर १९०५ भाविकांनी मुर्तींचे दान दिले.
रावेत शिंदेवस्ती,गुरुद्वारा, बिजलीनगर प्रेमलोक पार्क,चिंचवडेनगर बळवंतनगर शिवनगरी गिरीराज परिसरातील २६८ गणेशभक्तांनी संस्कार प्रतिष्ठानच्या फिरत्या गणपती संकलन गाडीमध्ये गणपती दान दिले गाडीसोबत निर्माल्य पण जमा केले.संस्कार प्रतिष्ठानने एकूण २१७३ *गणपतीदान* घेतले संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जनाच्या सहाही दिवशी वेगवेगळ्या टिम तयार करुन प्रत्येक टिमला जबाबदारी दिली आहे.
ब प्रभाग स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी तसेच आज पाचव्या दिवसाची जबाबदारी संस्थेचे सचिव भरत शिंदे,टी प्रभाकरण आणि कामगार कल्याण केंद्र प्रमुख प्रदिप बोरसे यांनी सहभाग घेऊन उत्तमरित्या पार पाडली दान घेतलेल्या मुर्तींचे विनोदेवस्तीवरील तळ्यावर गेल्यानंतर विधीवत विसर्जन केले .
यामध्ये ब प्रभाग अधिकारी सोनम देशमुख,ड प्रभाग अधिकारी श्री उमाकांत गायकवाड ,डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शब्बीर मुजावर,मनोहर कड,रमेश भिसे, अरुण कळंबे, प्रदिप साळुंखे, जितेंद्र जाधव,सतिश उघडे,दिलीप,शुभम खरपुडे,अक्षय खरपुडे रुपाली नामदे,अनुषा पै रामदास सैंदाने,सोमनाथ पतंगे,सतीश गवळी,बाळू माने जयवंत सुर्यवंशी,डॉ मारुती शेलार,डॉ.राकेश मिश्रा,डॉ योगेश झांबरे यांनी सहभाग घेतला होता.सामाजिक कार्यकर्ते श्री खंडूशेठ चिंचवडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना चहा व नाष्ठ्याची व्यवस्था केली होती.

error: Content is protected !!